Indian Navy Recruitment २०२३
Indian Navy Recruitment २०२३ : भारतीय नौदल [Indian Navy] मध्ये अग्निवीर [एमआर (संगीतकार)] पदाच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. एकूण ३५ जागा रिक्त आहेत. जे उमेदवार या पदांसाठी पात्र आहेत ते ऑनलाईन अर्ज करू शकतात. सर्व पात्र आणि इच्छुक उमेदवार सर्व आवश्यक कागदपत्रे प्रमाणपत्रासह दिलेल्या निर्देशानुसार या पदासाठी अर्ज करू करतात. अर्जदाराने शेवटच्या दिनांकापूर्वी अर्ज करावा. या पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची दिनांक ०२ जुलै २०२३ आहे. या भरती संदर्भात खाली दिलेली संपूर्ण माहिती वाचा.
Indian Navy Recruitment २०२३
एकूण पदे : ३५ जागा
पदांचे नाव : अग्निवीर [एमआर (संगीतकार)]
शैक्षणिक पात्रता :उमेदवाराने भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाने मान्यता दिलेल्या शालेय शिक्षण मंडळातून मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी.
वेतनश्रेणी : ३०,०००/- ते ४०,०००/- रुपये
वयोमर्यादा : उमेदवाराचा जन्म ०१ नोव्हेंबर २००२ ते ३० एप्रिल २००६ दरम्यान झालेला असावा.
अर्ज शुल्क : फी नाही
नोकरी स्थान : संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख : ०२ जुलै २०२३